Pune News: ‘रागाने का पाहत होता, लय शहाणा झाला काय’ असे म्हणत तरुणाला मारहाण

फिर्यादी विकास हा श्रद्धा मारूती मंडळ कॅनालजवळ उभा होता. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या आरोपींनी तू आमच्याकडे 'रागाने का पाहत होता, लय शहाणा झाला काय' असे म्हणत त्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

एमपीसी न्यूज – ‘रागाने का पाहत होता, लय शहाणा झाला काय’ असे म्हणत तरुणाला तीन अनोळखी इसमांनी मारहाण केली आहे. हि घटना मंगळवारी (दि.8) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास जनता वसाहत, पर्वती येथे घडली.

याप्रकरणी विकास माळी (वय 19, जनता वसाहत, पर्वती, पुणे) या तरूणाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास हा श्रद्धा मारूती मंडळ कॅनालजवळ उभा होता. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या आरोपींनी तू आमच्याकडे ‘रागाने का पाहत होता, लय शहाणा झाला काय’ असे म्हणत त्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच हातातील धारधार शस्त्राने पायाचा गुडघा, घोटा आणि हाताचा पंजा व मनगटावर वार करून जखमी केले. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.