Pune News : प्रसिद्ध जॅार्ज हॅाटेलमध्ये चोरी

एमपीसी न्यूज- लष्कर भागातील प्रसिद्ध असलेल्या जॉर्ज हॉटेलचा (Pune News)  दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील 93 हजारांची रोकड आणि मोबाइल संच असा एक लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Yerwada News : येरवडा येथे ट्रॅव्हलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

याबाबत जॉर्ज हॉटेलचे मालक जवहार इस्माइल जवादी (वय 62, रा. परमारनगर, वानवडी) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लष्कर भागातील इस्ट स्ट्रीट परिसरात जॉर्ज हॉटेल आहे. चोरट्यांनी मध्यरात्री हॉटेलचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ला उचकटून चोरट्यांनी 93 हजारांची रोकड आणि आठ मोबाइल संच असा मुद्देमाल लांबविला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी (Pune News) भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.