Pune News : पुणे शहरात आहेत 500 प्रतिबंधित क्षेत्र, हा भाग आहे सर्वाधिक प्रभावित

एमपीसी न्यूज – शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 500 च्या घरात पोहचली आहे. आठवडा भरात शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 125 ने वाढली आहे. शहरातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असतानाच; सोसायटीत 20 पेक्षा अधिक आणि इमारतीत 5 पेक्षा अधिक कोरोनाबाधित असलेल्या इमारती सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्या जात आहेत.

शहरातील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. ज्या परिसरात व इमारतीमध्ये 5 पेक्षा अधिक रुग्ण आढळून येतात, असा परिसर व इमारत, सोसायटी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत केले जाते.

_MPC_DIR_MPU_II

इमारती किंवा सोसायटीमध्ये असणार्‍या रुग्णांच्या हातावर स्टॅम्प मारला जातो. तसेच दोन्हीच्या प्रवेशद्वारावर रुग्णांचे नावही लिहिले जाते. रुग्णांना या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातून ये-जा करण्यास मनाई आहे.

दररोज रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यामुळे शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राच्या संख्येतही वाढ होत आहे. सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या सहकारनगर-धनकवडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीत असून ती 74 आहे. त्या खालोखाल वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 67 आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 62 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. यापूर्वी सर्वाधिक प्रतिबंधित क्षेत्र औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत होते. मात्र, आठवडाभरातच धनकवडी-सहकारनगर भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्याचे समोर आले आहे.

सध्या सर्वाधिक रुग्ण हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सापडत आहेत. मात्र, या भागातील मोठ्या सोसायट्यांमध्येच ही रुग्णवाढ सुरु असल्याने या भागात अद्याप कंटेन्मेंट झोनची संख्या स्थिर आहेत. दरम्यान, शहरातील वरील तीन क्षेत्रीय कार्यालये वगळता इतर 12 क्षेत्रीत कार्यालयांमध्ये 50 पेक्षा कमी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असून सर्वांत कमी 9 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. तर 10 प्रतिबंधित क्षेत्र कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.