Pune News : यंदा पुण्यातील उद्यानांमध्ये दिवाळी पहाट नाही !

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील 81 उद्याने एक नोव्हेंबर पासून खुली करण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आला. परंतु, उद्यांनामध्ये हास्यक्लब, योगा, दिवाळी पहाट, व्हिडीओ शुटिंगला मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रमांना मुकावे लागणार आहे.

पुणे महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी उद्याने खुली करण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या आदेशात नियमावली व अटी नमूद केले आहेत. त्यानुसार शहरातील कंटेंन्मेट झोनबाहेरील 81 उद्याने उघडण्यासाठी वेळेचे बंधन असणार आहे.

शहरातील सर्व उद्याने सकाळी 5 ते 7 आणि सांयकाळी 6 ते 8 अशी केवळ सहा तासांसाठी खुली राहणार आहेत. तोंडाला मास्क, सोशल डिस्टंन्सिग आणि हँड सॅनिटायजरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. उद्यांनामध्ये हास्यक्लब, योगा, दिवाळी पहाट, व्हिडीओ शुटिंगला परवानगी नाकारण्यात आली आहे.

तसेच दहा वर्षाखालील लहान मुले, 65 वर्षांवरील आजारी व्यक्ती, वृद्ध आणि गरोदर महिलांना प्रवेश देता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III