Pune News : दोन उपमुख्यमंत्री पद असे काहीही ठरलेले नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

एमपीसी न्यूज : राज्यात आणखी एक उपमुख्यमंत्री पद असे काही ठरलेले नाही. मी कालच हे सांगितलं आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वडगाव बुद्रूक येथे पत्रकार परिषदेत केला.

राज्यातील महापालिका निवडणुकीत मतांची विभागणी होऊ नये. या दृष्टीने येत्या काळात पावले उचलली जातील. याबाबत शिवसेना, काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. तसेच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सारखच यश महापालिका निवडणुकात ही मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या निवडीबाबत राज्यपाल अद्यापपर्यंत निर्णय घेत नाही. त्यावर अजित पवार म्हणाले, राज्यपालांनी आता अंत पाहू नये. मुख्यमंत्र्यांच्या सहीनिशी प्रस्ताव दिलेला आहे. याबाबत आता राज्यपालांची वेळ घेऊन चर्चा करणार आहोत. तसेच आमचं 171 आमदारांचे बहुमत सिद्ध झालेले आहे.

तसेच पेट्रोल डिझेल दरवाढ राज्याने कमी करावी अशी मागणी भाजपचे नेते करीत आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले की, आधी केंद्राला टॅक्स कमी करायला सांगा. मग आम्ही टॅक्स कमी करण्यावर विचार करू.

धनंजय मुंडे प्रकरणी पवार म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात पोलिसांनी काल धनंजय मुंडे यांच्या मुलांचे जबाब घेतलेला आहे. यात कोणीही राजकीय हस्तक्षेप करणार नाही. पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत या प्रकरणावर काहीही बोलता येणार नाही, असे स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.