Pune News : जलकेंद्रातील दुरुस्ती कामामुळे शहराच्या काही भागात शनिवारी पाणी नाही

एमपीसी न्यूज – पर्वती, वडगांव, नवीन लष्कर जलकेंद्र अंतर्गत 3 हजार मि. मि. रो वाटर लाईन विषयक दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात येणार आहे. शनिवारी (दि. 26 सप्टेंबर) सकाळी 9 ते सायंकाळी 9 या दरम्यान हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणची पंपिंग यंत्रणा बंद ठेवावी लागणार आहे. म्हणून पुण्याच्या काही भागांत शनिवारी पिण्याचा पाणीपुरवठा होणार नाही.

रविवारी (दि. 27 सप्टेंबर) पाणीपुरवठा होणार असल्याचे पुणे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, केशवनगर, सोलापूर रस्ता, सातववाडी, हांडेवाडी रोड, फातिमानगर, घोरपडी, बी. टी. कवडे रोड, खराडी, चंदननगर, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, गुलटेकडी, सहकारनगर, भवानी पेठ, महात्मा फुले पेठ, घोरपडी पेठ, मुकुंदनगर, पद्मावती, इंदिरानगर, बालाजीनगर, शिवदर्शन, तळजाई वसाहत, धनकवडी, हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, आंबेगाव पठार, कात्रज, भरती विद्यापीठ, धनकवडी, शिवाजीनगर, सुतारदरा, कोथरूड, शास्त्रीनगर, गोखलेनगर, रेव्हेन्यू कॉलनी, आपटे रोड, घोले रोड परिसरात शनिवारी पाणी येणार नाही.

शनिवारी (दि. 26 सप्टेंबर) सकाळी 9 ते सायंकाळी 9 या दरम्यान हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणची पंपिंग यंत्रणा बंद ठेवावी लागणार आहे. म्हणून पुण्याच्या काही भागांत शनिवारी पिण्याचा पाणीपुरवठा होणार नाही.

तर रविवारी या भागात नियमित पाणीपुरवठा सुरु राहणार असल्याचे पुणे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.