Pune News : शहरातील 7 क्षेत्रीय कार्यालय परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही

एमपीसी न्यूज – शहरातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून सक्रिय कोरोना रुग्ण संख्या घटली आहे. त्यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्र देखील कमी झाली असून शहरात सध्या अवघे 28 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र उरली आहेत. तर शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांपैकी 7 क्षेत्रीय कार्यालय परिसरात एक हि सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र उरलेले नाही.

शहरातील कोरोना रुग्ण संख़्या वाढत असतानाच सोसायटीत 20 पेक्षा अधिक आणि इमारतीत 5 पेक्षा अधिक कोरोनाबाधित असलेल्या इमारती सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्या जात होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च, एप्रिलमध्ये शहरात सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 50 हजारांच्या घरात पोचली होती. त्यावेळी शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांनाची संख्या 600 पर्यंत जाऊन पोचली होती ती आता शहरातील चित्र पालटले असून आता शहरात अवघी 28 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र उरली आहेत.

शहरात 16 एप्रिल अखेर सूक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्राची संख्या 497 होती. तर, त्यापूर्वी सलग तीन आठवडे ही क्षेत्रांची संख्या आठवड्याला 100 ने वाढत होती. मात्र, 17 एप्रिलपासून नवीन करोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढली असून बाधितांचा आकडाही उतरणीला लागला आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रातील रूग्ण बरे होत आहेत, तो भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात येत आहे. परिणामी, शहरात आता 28 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र आहेत. त्यात, 6 इमारती तर 10 सोसायट्यांचा समावेश आहे. तर इतर 12 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांचा समावेश आहे.

तर शहरातील बिबवेवाडी, भवानी पेठ, कोंढवा- येवलेवाडी, वारजे-कर्वे नगर, कोथरूड -बावधन, ढोले पाटील रोड, येरवडा – कळस – धानोरी या क्षेत्रीय कार्यालय परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही तर कसबा- विश्रामबागवाडा ,औंध – बाणेर, शिवाजी नगर घोले रोड, नगर रोड वडगाव शेरी या क्षेत्रीय कार्यालयांचे परिसरात प्रत्येकी 1 प्रतिबंधित क्षेत्र आहे, तर शहरात सर्वाधिक 9 प्रतिबंधित क्षेत्र सिंहगड रोड आणि धनकवडी सहकार नगर येथे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.