Pune news : पंतप्रधानांच्या ‘त्या’ ताफ्यात होते दोन कोरोना पॉझिटिव्ह !

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या लसीच्या पाहणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिरम इन्स्टिट्यूट पाहणी दौऱ्यामध्ये तैनात ताफ्यात दोन पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेसाठी त्यावेळी संपूर्ण तयारी म्हणून सुरक्षा व्यवस्था, व्यवस्थापन, भेटणार्‍या प्रत्येक व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

मात्र, तरीही त्यामध्ये दोन व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या होत्या. परंतु, तात्काळ त्यांची बदली करुन दुसऱ्या व्यक्तींची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लसीसंदर्भात सिरमला भेट दिली. या भेटीच्या अगोदर प्रशासनाकडून पुर्ण तयारी करण्यात आली होती. मोदींना भेटणार्‍या प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली होती.

यामध्ये पुणे विमानतळावर भेटणार्‍या व्यक्ती आणि सिरम इन्सिटयुटमध्ये त्यांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तींचा समावेश होता.

महापालिकेच्या आरोग्य विभागावर ही जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने संपर्कात येणार्‍या सर्व नागरिकांची तपासणी केली. यामध्ये दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. याव्यक्तींना दौर्‍यातून तत्काळ वगळण्यात आले होते.

पंतप्रधान मोदींच्या दौर्‍याच्यावेळी खास सुरक्षा व्यवस्था असते. त्यामुळे सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली होती. मोदी यांनी सिरममध्ये कोरोना लसी संदर्भात माहिती घेतली होती. यावेळी 100 देशांचे राजदुत सुध्दा पुणे दौर्‍यावर येणार असल्याची चर्चा होती. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव तो दौरा रद्द करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.