Pune News: पुण्यात कोणत्याही प्रकारचे नव्याने लॉकडाऊन होणार नाही- महापौर मोहोळ

नव्याने काही मायक्रो कंटेन्मेंट झोन केले असतील, त्या ठिकाणी यामागील काळात असलेले नियम आणि काही वेळा ठरवून दिलेल्या असतील त्याच पद्धतीने जनजीवन असेल.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात नव्याने कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी मांडली आहे.

आपण आढावा घेऊन काही दिवसांनी नवीन कंटेन्मेंट झोनची निर्मिती करतो आणि ज्या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे, तिथे अजिबात रुग्ण नाहीत. तिथे कंटेन्मेंट झोन वगळतो. त्यामुळे नव्याने काही कंटेन्मेंट झोन केले. त्या भागात थोडीशी व्यवस्था करायची म्हणून रस्ते, गल्ल्या, त्या ठिकाणी पत्रे लावणे, बंदोबस्त करणे हा त्यातील एक भाग असतो.

परंतु, लॉकडाऊनप्रमाणे परिस्थिती त्या ठिकाणी सुद्धा असणार नाही. एक ऑर्डर सिंहगड क्षेत्रीय कार्यालयातर्फे निघाली आहे. त्या ठिकाणच्या वॉर्ड ऑफिसरनी काढली आहे. दुकाने बंद राहणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, अशी कोणतीही परिस्थिती येणार नाही.

ही ऑर्डर ताबडतोब रद्द करण्याची सूचना महापालिका आयुक्तांना करण्यात आली आहे, अशी माहितीही महापौरांनी दिली. त्यामुळे पुणे शहरात कोणत्या प्रकारचा नव्याने लॉकडाऊन असणार नाही. नव्याने काही मायक्रो कंटेन्मेंट झोन केले असतील, त्या ठिकाणी यामागील काळात असलेले नियम आणि काही वेळा ठरवून दिलेल्या असतील त्याच पद्धतीने जनजीवन असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.