Pune News : …म्हणून पुण्यातील उद्यानं आणखी काही दिवस बंदचं राहतील; स्वतः आयुक्तांचा खुलासा

एमपीसीन्यूज : अनलॉक प्रक्रियेनंतर पुण्यातील उद्योग व्यवसाय व जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. टप्प्याटप्प्याने 11 व्यवसाय सुरू करण्यास महानगरपालिकेतर्फे परवानगी देण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेने एक आदेश काढला असून या आदेशानुसार अंतर राखून ठेवता येणारे इनडोअर आणि आउटडोअर खेळांसाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु असे असले तरी शहरातील गार्डन मात्र अजूनही बंदच राहणार आहे.

उद्यान सुरू करण्याच्या निर्णयाविषयी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार म्हणाले, उद्यान सुरू करण्याचा निर्णय अजूनही झाला नाही. त्याचे कारण म्हणजे अजूनही मान्सून सुरू आहे.

उद्यानामध्ये जाणारे बहुतांशी नागरिक हे 60 वर्षांपेक्षा अधिक किंवा दहा वर्षापेक्षा खालील वयोगटातले आहेत. आणि हे दोन्ही वयोगट covid-19 च्या बाबतीत रिस्की वयोगट आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यामुळे मान्सून थांबल्यानंतर उद्यानं सुरू करायची की नाही यावर निर्णय घेतला जाईल.

आयुक्त म्हणाले, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू शहर पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल उघडण्यासाठी यापूर्वीच परवानगी देण्यात आली आहे.

आज ऑर्डर काढली असून त्यानुसार इनडोअर आणि आउटडोअर खेळांना परवानगी दिली आहे. हे खेळ खेळताना लोकांनी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. covid-19 च्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांचं पालन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.