Pune Crime : बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधील दीड लाखाचे दागिने चोरांनी पळवले

एमपीसी न्यूज – पीएमपीच्या बसमध्ये चढताना एक महिलेच्या पर्समधील दीड लाखाचे दागिने चोरुन चोर दुचाकीवरून पसार झाले आहेत. हि घटना गुरुवारी (दि.28) शिवाजीनगर मनपा डेपो येथे घडली.

याप्रकरणी 28 वर्षीय महिलेनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शिवाजीनगरहून निगडीला जाण्यासाठी मनपा बसस्थानकावर थांबल्या होत्या. निगडीला जाणा-या बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या पर्समधील 1 लाख 54 हजार किंमतीचे दागिने चोरुन दुचाकीवरून पसार झाले आहेत. शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.