Pune News : चौकटीबाहेर जाऊन विचार करा; सातत्याने नाटक करा- श्याम जोशी

एमपीसी न्यूज-रंगकर्मींना स्वत:मधल्या कलाकाराची ओळख करून देणारी प्रयोगशाळा म्हणजे महाराष्ट्रीय कलोपासकची स्पर्धा होय. नाटक ही करून पाहण्याचीआनंद मिळविण्याची गोष्ट आहे. स्पर्धेत पारितोषिक मिळविणे महत्त्वाचे नसून चौकटी बाहेर जाऊन विचार करासातत्याने नाटक करा , (Pune News) असा अनुभवाचा आणि मोलाचा सल्ला ज्येष्ठ लेखकरंगकर्मी आणि वाणी संस्कार प्रशिक्षक श्याम जोशी यांनी शालेय विद्यार्थीपालक आणि शिक्षकांना दिला. स्पर्धेत सातत्याने सहभाग घेतल्यास भविष्यात मोठे होण्याच्या वाटा दिसू लागतील, असेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे माध्यमिक शाळास्तरावर आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय नाटिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज (दि. 27) भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. पारितोषिक वितरण श्याम जोशी यांच्या हस्ते झाले.

Pune News : शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या संचालकपदी भानुदास पऱ्हाड यांची नियुक्ती

त्या वेळी त्यांनी शिक्षकपालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकरगंगोत्री होम्स अ‍ॅण्ड हॉलिडेजचे संचालक गणेश जाधवमकरंद केळकर रंगमंचावर होते. स्पर्धेचे परिक्षण चिन्मय केळकरदिगंबर निघोजकर आणि डॉ. मानसी मागीकर यांनी केले.

पारितोषिक वितरण समारंभापूर्वी राजा नातू करंडक पटकाविलेल्या आर्यन वर्ल्ड स्कूल वारजेच्या संघाने गोष्टींची गोष्ट तर नाविन्यूपर्ण व कल्पक सादरीकरणासाठी मथुरामाई करंडकाच्या मानकरी ठरलेल्या नूमवि मुलींची प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाने दर्पण ही नाटिका सादर केली.

श्याम जोशी पुढे म्हणालेहरविणे आणि गवसणे हे आयुष्यभर चालूच असते , त्यामुळे स्पर्धा केवळ पारितोषिके मिळविण्यासाठी नसतात. आयुष्यात विद्यार्थीपण जपा . त्याचबरोरीने चौकटीबाहेर विचार करा. परंतु चौकटीबाहेर जाणे म्हणजे दुर्बोधता अपेक्षित नाही.

कधीतरी शाळा बुडली तरी चालेल पण स्पर्धा बुडता कामा नये ,असे सांगत ते पुढे म्हणालेनाटक ही अभ्यासपूर्ण सौंदर्यमय कला आहे. प्रेक्षक कलाकारांशी खेळतात याची दृष्टी प्राप्त होणे म्हणजे नाटक होय. सरळपणात वळण हे शास्त्रात नसते परंतु कलेत असते, असेही (Pune News) त्यांनी सूचित केले.

Pimpri News : सोहम सार्वजनिक ग्रंथालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

परिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना चिन्मन केळकर म्हणालेस्पर्धांच्या माध्यमातून कलाकार तर घडतीलच परंतु उत्तम प्रेक्षक तयार होणे शक्य आहे. कारण नाटक ही जीवंत कला आहे म्हणजे त्यात प्रेक्षक हा महत्त्वाचा भाग आहे. इतर माध्यमात प्रेक्षक हा घटक नंतर येतो.

परंतु नाटक सादरीकरण करताना प्रेक्षक आणि कलाकार दोनही घटक एकाच वेळी अनुभूती घेत असतात. लेखनसादरीकरणदिग्दर्शन यात काय सुधारणा व्हाव्यात या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

गणेश जाधव म्हणालेस्पर्धेनिमित्त मुलांचा प्रवास नाटकाभोवती झालेला जाणवला. या प्रक्रियेत पालकशिक्षक आणि विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले याचा आनंद आहे. अशा स्पर्धांमधून समाज घडविणेकशासाठी जगायचे याचे मार्गदर्शन मिळते.

मान्यवरांचा सत्कार अनंत निघोजकर यांनी केला. पुरस्कारांसाठी सहकार्य करणार्‍या मान्यवरांचा सत्कार श्याम जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन अश्विनी वाघ यांनी केले तर निकालाची घोषणा आणि आभार प्रदर्शन संस्थेचे चिटणीस अ‍ॅड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी (Pune News) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.