Pune News : हा तर लोकशाहीचा खून – जगदीश मुळीक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर हिंसाचार चालू केला आहे. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरावर हल्ला करून मारहाण आणि जाळपोळ करण्यात आली.

या हिंसाचारात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना जीव देखील गमवावा लागला आहे. ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचा हा उन्मत्तपणा म्हणजे लोकशाहीचा खून असल्याची घणाघाती टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

निवडणूक निकालानंतर बंगाल मधील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीने पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मुळीक बोलत होते.

मुळीक पुढे म्हणाले, ‘देशातील सर्व भाजप कार्यकर्ते हे बंगाल मधील कार्यकर्त्यांच्या बरोबर आहेत. निवडणूक निकालानंतर अशा प्रकारचा हिंसाचार या देशात आजपर्यंत कधीही झाला नाही. परंतु बंगालमध्ये तो मोठ्या प्रमाणावर चालू आहे. ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेला हिंसाचार ताबडतोब थांबवावा अन्यथा या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी.’

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.