Pune News : भारतीय गोलंदाज बुमराहची पत्नी संजना गणेशनचे असं आहे पुणे कनेक्शन

एमपीसी न्यूज – भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने टिव्ही प्रेझेंटर संजना गणेशन हिच्याशी गोव्यात विवाह केला. त्यानंतर या जोडीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. बुमराहची सर्वांना ओळख असली तरी हि संजना गणेशन कोण ? याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. तिचा पुण्याशी काय संबध असा प्रश्न चाहते करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार संजनाचा जन्म 6 मे 1991 रोजी पुण्यात झाला. बिशप शाळेत तिचं शालेय शिक्षण झाले, सिम्बॉयसिस मधून तिनं बी टेक ची पदवी घेतली. त्यानंतर संजना आयटी आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्राकडे वळाली. तिथून तिनं अँकरीग करायला सुरूवात केली. क्रीडा वाहिनी सोबत सूत्रसंचालन म्हणून काम करताना संचना घराघरात पोहचली.

असा आहे टिव्ही क्षेत्रातील प्रवास
संजना टिव्ही प्रेझेंटर होण्याआधी मॉडेल होती. तिनं फेमिना ऑफिशियली गॉर्जियस हा किताब जिंकला आहे. 2012 मध्ये तिने फेमिना स्टाईल दिवा मध्ये भाग घेतला होता. 2014 मध्ये फेमिना मिस इंडिया पुणे या स्पर्धेची ती फायनलिस्ट होती. 2019 मध्ये स्पोर्टेस नेटवर्कवर तिने मॅच पॉईंट शोचे सूत्रसंचालन केले. संजना स्प्लिट्स व्हिला या रिएलिटी शोमध्ये दिसली होती. या शोमुळे ती घराघरात पोहोचली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.