Pune News : यंदाचा ‘प्राईड ऑफ बीएमसीसी’ पुरस्कार गायक राहुल देशपांडे, उद्योगपती विजय पुसाळकर यांना तर ‘बीएमसीसी गुरुवर्य पुरस्कार’ प्रा. प्रकाश भोंडे यांना जाहीर

एमपीसी न्यूज – बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा ‘प्राईड ऑफ बीएमसीसी’ पुरस्कार यंदा प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि उद्योगपती विजय पुसाळकर यांना तर ‘बीएमसीसी गुरुवर्य पुरस्कार’ स्वरानंद संस्थेचे प्रमुख प्रा .प्रकाश भोंडे यांना जाहीर करण्यात आला आहे.

शनिवार  दिनांक 28 आॅगस्ट रोजी सांयकाळी 5 वाजता या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती बीएमसीसी महाविद्यालयाच्या प्राचार्या सीमा पुरोहीत आणि बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अरूण निम्हण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेचे सहसचिव किशोर लोहोकरे, दिनकर अष्टेकर, सुरेश केकाणे, बाळासाहेब गांजवे, सचिन नाईक, सुहास धारणे, संजय साबळे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्राचार्या सीमा पुरोहीत म्हणाल्या की, शनिवार दिनांक 28 आॅगस्ट 2021 रोजी, संध्याकाळी पाच वाजता, टाटा हॉल, बीएमसीसी महाविद्यालय येथे पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. राज्यमंत्री दर्जा प्राप्त महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह (एम.एस.सी.) चे अध्यक्ष ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अरुण निम्हण म्हणाले की, बाळासाहेब सरपोतदार पुरस्कारने सिने-नाट्य कलाकार श्रीराम पेंडसे यांना गौरविण्यात येणार आहे. तसेच वरुणराज भिडे पुरस्काराने पत्रकार श्रद्धा सिदीड, कांता मगर पुरस्काराने माजी रणजीपटू श्रीकांत जाधव, शिवराम फळणीकर पुरस्काराने रिचा चोरडिया आणि शिवानी सातव, वाणिज्य व उद्योजक पुरस्काराने उद्योजक नितीन देशपांडे यांना, शहीद कुणाल गोसावी पुरस्काराने ब्रिगेडीयर सुनील लिमये आणि विशेष पुरस्काराने राष्ट्रपती पदक विजेते ए.सी.पी. क्राईम पुणेचे सुरेंद्र देशमुख यांना व समाजसेवक कालीदास मोरे यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. करोना संदर्भातील शासनाचे सर्व नियम पाळून सदर कार्यक्रम होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.