Pune News : वाघोली येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक, 21 किलो 664 ग्रॅम गांजा जप्त

एमपीसी न्यूज – पुणे – अहमदनगर रोडवर वाघोली येथे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या तीन इसमांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने आज सोमवारी (दि.19) ही कारवाई केली. त्यांच्याकडून 6 लाख 80 हजार किंमतीचा 21 किलो 664 ग्रॅम गांजा व इतर साठा जप्त करण्यात आला आहे.

अक्षय अंबादास बिडगर (वय 25, रा. खराडी, पुणे), सोनल किसन काळे (वय 19, रा. जामखेड, अहमदनगर), सागर गोपीनाथ पोले (वय 19, धंदा काहीनाही, रा. कंधार, नांदेड) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत पट्रोलींग करीत होते.

त्यावेळी तीनजण एम एच 14 ए व्हि 4958 या चारचाकी गाडीत अवैध गांजा जवळ बाळगला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात एन.डी.पि.एस. कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.