Pune crime News : एकावर चाकूने वार करीत दहशत माजविणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – ‘अमुक एकजणासोबत का फिरतो’, असे म्हणत तीन जणांनी एकावर चाकूने वार करुन त्याच्या हाताला जखम केली तसेच भागात दहशत निर्माण केली. या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी आरोपी अमित भाट (वय 34, रा.वारजे, पुणे), अतुल शेलार (वय 35, रा.कोथरुड,पुणे), विजय कानगुडे (वय 36, रा. खिलारेवाडी,पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

साजिद शेख ( वय 36, रा. रविवार पेठ, पुणे ) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख हे त्यांच्या घरी जात असताना तीन आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवून ‘तू योगेश तापकिर याचे बरोबर का फिरतो’ असे विचारले.

त्यामुळे सर्व आरोपींनी संगनमत करुन  दहशत निर्माण केली व फिर्यादी शेख यांच्या हातावर चाकुने वार केले. शिवीगाळ व लाथा-बुक्कयांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.‌

डेक्कन पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.