Pune News : वेश्याव्यवसाय चालणा-या लॉजवर छापा टाकून तिघांना अटक, दोन महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – मुलींना लाॅजवर आणुन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करुन घेणा-या तिघांना अटक करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा विभाग व गुन्हे शाखा पुणे यांच्याकडून सोमवारी (दि.28) वारजे येथील साई एक्झीक्युटीव्ह लॉजवर ही कारवाई करण्यात आली.

जितेंद्र उर्फ जितु बाबासाहेब नंदिरे (वय 32, रा. ज्योतीबानगर,काळेवाडी, पुणे) एक महिला (वय 24, रा.वडगाव धायरी, पुणे) रामकिसन व्यंकट जाधव (वय 35, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याविरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे येथील साई एक्झीक्युटीव्ह लॉजवर आरोपी जितु व लॉज मॅनेजर हे मुलींना आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याची गुप्त माहिती पोलीस कॉन्सटेबल संतोष भांडवलकर यांना मिळाली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली साई एक्झीक्युटीव्ह लॉजवर अचानक छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपींना अटक करुन वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांच्यासह सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस नाईक आण्णा माने, पोलीस नाईक आश्विनी केकाण, पोलीस नाईक हनुमंत कांबळे व पोलीस कॉन्सटेबल संतोष भांडवलकर, पोलीस कॉन्सटेबल संदीप कोळगे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.