Pune News : महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी तीन दिवस धरणे आंदोलन!

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या विविध प्रकारच्या खात्यामध्ये 10 ते 12 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने 7500 कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. त्यांच्या प्रलंबित वेतनासह विविध मागण्यासाठी 5, 6 आणि 7 जानेवारी दरम्यान तीन दिवसीय धरणे आंदोलन पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने करण्यात आले.

महानगरपालिकेच्या टेंडर अटी शर्ती नुसार संबंधित ठेकेदाराने कंत्राटी कामगारांना वेतन चिठ्ठी दिली पाहिजे. भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यावर जमा केली पाहिजे. महागाई भत्त्यानुसार वेतनवाढ व दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत वेतन अदा करणे आवश्यक आहे. ई एस.आय.चे कार्ड नोंदणी करणे बंधनकारक आहे. गणवेश व सफाई करण्याची साधने उपलब्ध करणे आवश्यक आहे. काम करत असताना अपघात झाला तर मोफत वैद्यकीय उपचार केला पाहिजे. या सर्व कंत्राटी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मागण्यांचा पाठपुरावा युनियनच्या वतीने वारंवार करण्यात आला तसेच लेखी स्वरूपात पत्र व्यवहार करून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केले. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तीन दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन युनियनचे अध्यक्ष काॅ. उदय भट व जनरल सेक्रेटरी काॅ. मुक्ता मनोहर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात कार्याध्यक्ष काॅ. चंद्रकांत गमरे मधुकर नरसिंगे, मयुर खरात, सिद्धार्थ प्रभुणे, विभागीय अध्यक्ष,सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.