Pune News : पुन्हा एकदा मेट्रोच्या कामगारांनी धरला घरचा रास्ता

एमपीसी न्यूज – : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून त्याचा फटका आता मेट्रोला देखील बसला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मेट्रोच्या कामावर असलेले तीन हजार कामगार आपापल्या गावी निघून गेले असून मेट्रोचा प्रस्तावित मुहूर्त हुकणार असून पुणेकरांना मेट्रोसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी मेट्रोच्या हजारो कर्मचाऱ्यांनी घराचा रास्ता धरला होता. नंतरच्या काळात कोरोना काही प्रमणात कमी झाल्या नंतर कामगार पुन्हा परतले होते. परंतु महाराष्ट्रात लॉकडाऊनची परिस्थिती निर्मण होताच पुन्हा एकदा मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी घराचा रास्ता धरला आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरात खाटा नाहीत, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर नाहीत अशी स्थिती होऊ लागल्यावर इथे राहिलेले अनेक कामगार अचानक ग्रुप करून आपापल्या गावी निघून गेले. किमान तीन हजारांनी कामगारांमध्ये घट झाली असल्याची माहिती मिळाली. ठेकेदारांकडे असलेले यातील बहुसंख्य कामगार मेट्रोच्या कामात कुशल आहेत. त्यामुळे तर ठेकेदार कंपनीची जास्त अडचण झाली आहे.

वनाज ते गरवारे महाविद्यालय तसेच पिंपरी- चिंचवड ते बोपोडी हे दोन मार्ग प्राधान्य मार्ग म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. यातील पिंपरीकडच्या मार्गाची चाचणी घेण्यात आली आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय मार्गाचे अंतीम काम सुरु आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या कामांची आता अडचण झाली आहे. पुरेशा संख्येने कामगार ऊपलब्ध होत नसल्याने कामाची गती कमी झाली आहे, अशी माहिती महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.