Pune News : वाहनचोरी करणा-या तिघांना अटक, 11 वाहन चोरीचे गुन्हे उघड

एमपीसी न्यूज – वाहन चोरी करणा-या तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 11 गुन्हे उघड करण्यात आले आहेत. अलंकार पोलिसांनी ही कारवाई केलीय.

उमेश विठ्ठल पवार (वय 32, रा. बार्शी, सोलापूर), गणेश वाघमारे(वय 20, रा. शिवणे, हवेली) आणि एक आरोपी असे एकूण तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलंकार पोलिसांनी आरोपी उमेश पवार याला बार्शी येथून ताब्यात घेतले. तसेच, इतर दोन आरोपींना अटक करून त्याच्यांवरील अलंकार, हिंजवडी, वाकड, डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल 11 गुन्हे उघड करण्यात आले आहेत. आणि 1 लाख 90 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.