Pune News : अतिक्रमण कारवाईदरम्यान अधिकारी व पोलिसांवर दगडफेक ; दहा जणांवर गुन्हा दाखल

सात जणांना अटक करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज – अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी गेलेल्या पुणे महापालिकेच्या अधिकारी व पोलिसांना धक्काबुक्की करीत त्यांच्यावर दगडफेक करून कारवाईला विरोध केल्याची घटना मंगळवारी (दि.14) दुपारी एकच्या सुमारास पीएमसी कॉलनी, वाकडेवाडी येथे घडली. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सात जणांना अटक करण्यात आली आहे.

शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी संदिप मुकुंद तारु (वय 34), सुहास नामदेव लोंढे (वय 24), कुमार बाबु ओव्हाळ (वय 18), अंकुश खंडू गायकवाड (वय 33 ), नामदेव खंडू लोंढे (वय 55), दोन महिला (वय सर्व रा.पीएमसी कॉलनी वाकडेवाडी, शिवाजीनगर) यांना अटक केली आहे तर, इतर तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी राकेश विटकर (वय 48, रा. पिंपळे सौदागर, पुणे ) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विटकर हे पुणे महापालिकेच्या चाळविभाग कार्यालयात उप-अधिक्षक या पदावर कार्यरत आहेत.

या कार्यालयामार्फत वाकडेवाडी येथे अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी अतिक्रमण कारवाई सुरु होती. त्यावेळी आरोपी इसम व महिलांनी अतिक्रमण कारवाईला विरोध करुन जेसीबीवर तसेच मनपा अधिकारी, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली.

अतिक्रमण कारवाई थांबवत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. मनपा अधिकारी व पोलिसांना अपशब्द वापरुन धक्काबुक्की केली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1