Pune News : आईच्या निधनाचे दुःख विसरण्यासाठी लहानथोरांसह तापकीर कुटुंबियांची वृद्धाश्रमात सेवा…

एमपीसी न्यूज : घरातील आधारवड (Pune News) असलेली आई सर्वांना सोडून गेल्यानंतर जगातील दुःखाची जाणीव घरातील सर्वांना व्हावी, दातॄत्व व करूणेची भावना नव्या पिढीमध्ये निर्माण व्हावी, यासाठी च-होली येथील तापकीर कुटुंबीयांनी शनिवारी(ता.17) वृद्धाश्रमात दिवस व्यतीत केला.
च-होलीती लक्ष्मीबाई दत्तात्रय तापकीर यांचे 18 नोव्हेंबर रोजी निधन झाले. मृत्यूनंतरचे सर्व विधी व पारंपारिक रितीरिवाजांपेक्षा आपल्या शरीराचा कोणाला तरी उपयोग व्हावा, यासाठी लक्ष्मीबाईंनी देहदान केले. करुणा, माया, ममता व समाजातील उपेक्षित यांना नेहमी आधार व पाठिंबा देण्याचे काम लक्ष्मीबाईंनी आपल्या हयातीत केले होते. लक्ष्मीबाईंच्या कार्यगुणाचा परिचय च-होली व चिंचवड परिसरात असलेल्या त्यांच्या सर्व आप्तेष्ट, नातेवाईक व परिचितांना होता. आधुनिक विचारधारेच्या आपल्या आईच्या सेवाव्रती कार्याचा वारसा जपण्यासाठी त्यांचे चिरंजीव वसंत तापकीर (मूळचे च-होली, रा. चिंचवड) यांनी मावळ तालुक्यातील कुसवली येथील सहारा वृद्धाश्रमात शनिवारी भेट दिली.

Talegaon Dabhade : अशोक काळोखे यांच्यातर्फे 750 विद्यार्थ्यांना मोफत दिनदर्शिका वाटप
वडील दत्तात्रेय, पत्नी अनुपमा, मुले, तीन बहिणी, सासूबाई ,भाचे, पुतणे आदींसह तापकीर (Pune News) यांनी येथील निराधार आजी आजोबांना नवीन कपडे व साड्या भेट दिल्या. आपल्या सर्व कुटुंबाचा परिचय आजी-आजोबांना करून देत त्यांच्या आश्रमात येण्यापर्यंतच्या प्रवासाची माहिती आस्थेने सर्वांनी जाणून घेतली. पूर्वी पत्र्याचे असलेल्या व आता सध्या आश्रमाचे पक्के बांधकाम सुरू असल्याने वीट, सिमेंट घेण्यासाठी मदतीचा हातही तापकीर कुटुंबियांनी यावेळी दिला.

एमपीसी न्यूजचे सहयोगी संपादक अनिल कातळे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे हे देखील यावेळी उपस्थित होते. वृद्धाश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी सर्वांचे स्वागत करून माहिती दिली. पिंपरीतील सावली निराधार संस्था तसेच कोयाळी येथील स्नेहवन संस्थेस तापकीर यांच्या वतीने धनादेश देण्यात आले.