Pune News : सैनिकांच्या वीरपत्नी व वीरमातांंना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत

शूरयोद्धा येसाजी कामठे प्रतिष्ठानतर्फे आयोजन

एमपीसी न्यूज – शूरयोद्धा येसाजी कामठे प्रतिष्ठानतर्फे सैनिकांच्या वीरपत्नी व वीरमातांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. प्रत्येकी दहा हजार रुपये देऊन या वीरमाता आणि वीरपत्नींचा गौरव करण्यात आला. शिवजयंती निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.

शूरयोद्धा येसाजी कामठे प्रतिष्ठान, महाराष्ट्रच्या वतीने कोंढवा बुद्रुक येथील येसाजी कामठे कुस्ती संकुल येथे आर्थिक मदत प्रदान व सन्मान सोहळा पार पडला. यावेळी नेताजी कामठे, रवींद्र कामठे, हरिभाऊ कामठे, आबा कामठे (इगतपुरी), प्रतिष्ठानचे विश्वस्त विश्वजित कामठे, डॉ. कुणाल कामठे, विनायक कामठे, दीपक कामठे, गोरख कामठे, महेंद्र कामठे, विजय कामठे, गौरव कामठे, जीवन कामठे, शिवानाना कामठे, गणेश कामठे (म्हाळुंगे), नितीन कामठे, उमेश कामठे, महिला विभागाच्या डॉ. शर्मिला कुणाल कामठे आदी उपस्थित होते.

वीरमाता लता नायर, वीरपत्नी दिपाली मोरे, कुसुम जाधव, मालुताई पाटील, सोनाली फराटे यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ व तुळशीचे रोप असे सन्मानाचे स्वरुप होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी केलेल्या कार्याला कार्यक्रमात उजाळा देण्यात आला. देशाच्या सीमेवर रात्रंदिवस देशाच्या रक्षणासाठी सैनिक खडे ठाकलेले असतात. काही सैनिकांना देशसेवा करताना वीरमरण प्राप्त होते. त्यामुळे त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाला समाजाने आधार देण्याची जबाबदारी असते. त्याच भावनेने हा मदतीचा हात आणि वीरपुत्रांचे स्मरण या कार्यक्रमात करण्यात आले.

सुनील कामठे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश कामठे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.