Pune News : शिवाजीनगर एसटी अगाराला परिवहन मंत्र्यांनी दिली भेट

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील वाकडेवाडी (शिवाजीनगर) एसटी आगाराला रविवारी परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी भेट देली. डेपो, बसेसची स्वच्छता, प्रवाशांसाठीच्या सोयी – सुविधा आदींचा आढावा त्यांनी घेतला. याशिवाय शिवाजीनगर येथे सुरु असलेल्या मेट्रो कामाचीही माहिती घेतली.

राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब रविवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांनी सकाळी साडेदहा वाजता वाकडेवाडी एसटी आगाराला भेट दिली. यावेळी एसटीचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड, ज्ञानेश्वर रणवरे आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मेट्रो कामामुळे एसटीचे शिवाजीनगर येथील आगार वाकडेवाडी येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. याठिकाणी प्रवाशांना मिळणाऱ्या सेवा – सुविधा, बसेसची स्वच्छता आदींची परब यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणी करण्यासाठी मंत्री परब स्वतः बसमध्ये गेले होते.  यावेळी त्यांनी एसटी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. तर, पुणे महामेट्रोतर्फे पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा 2 मेट्रो मार्गाचे काम जोरात सुरू आहे. पुण्यात लवकरच मेट्रो धावणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भल्या पहाटेच मेट्रो चालकाच्या बाजूला उपस्थित राहून आढावा घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.