-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : मुंबईचा प्रवास आणखी सुकर, पुण्यातून सुरू होणार हेलीकॉप्टर सेवा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पुणे ते मुंबईपर्यंतचा प्रवास आता हेलीकॉप्टरने करता येणार आहे. हेलीकॉप्टर सेवा पुरविणाऱ्या ‘ब्लेड’ या कंपनीने रिअल इस्टेट डेव्हलपर ‘पंचशील’ या कंपनी सोबत हातमिळवणी केली आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

खराडीतील ‘यो विला’ या ठिकाणाहून हि सेवा दिली जाणार असून, मुंबईचा प्रवास आणखी सुकर होणार आहे. खराडीतील कर्मचारी व ‘यो विला’ रहिवासी यांच्यासाठी ही सेवा उपलब्ध असेल. या सेवेमुळे पुणे – मुंबई प्रवासाचा वेळ कमी होणार असून अवघ्या 35 मिनटात मुंबईत पोहचता येणार आहे. सतत पुणे – मुंबई प्रवास करणा-यांसाठी हि सेवा उपयुक्त ठरणार आहे.

हंच व्हेंचर्स आणि ब्लेड इंडियाचे संस्थापक करणपाल सिंह म्हणाले की, प्रवासाची वेळ कमी करण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे पुणे – मुंबई दरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हि सेवा उपयुक्त ठरेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.