Pune News : नवी पेठेतील रस्त्यांवरील खड्ड्यात वृक्षारोपण, काँग्रेसचे प्रतिकात्मक आंदोलन

एमपीसी न्यूज – नवीपेठ, गांजवे चौक, शास्त्री रोड, सेनादत्त पेठ, अनंत कान्हेरे पथ ते पत्रकार भवनकडे जाणारा रस्ता आणि आसपासच्या परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करून प्रतिकात्मक आंदोलन केले.

येत्या काळात खड्डे बुजवण्याचे काम तत्काळ न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसचे पदाधिकारी व पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे यांनी दिला आहे. यावेळी स्थानिक नागरिक व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. सगळीकडेच खड्ड्यांची भरमार आहे. वाहनचालकांना खड्डा चुकवत वाहने चालवत कसरत करावी लागत आहे. हे खड्डे चुकविण्याच्या नादात वाहने एकमेकाला धडकून अपघात होत आहेत. भर रस्त्यांमध्ये मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या प्रश्नावर पुणे महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही का ? असा सवाल काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.