Pune News: नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, तीन ट्रक एकमेकांना धडकले

एमपीसी न्यूज: अपघातांचा हॉट स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवले पुलावर आज पुन्हा एकदा अपघात झाला. मालवाहतूक करणारे तीन ट्रक एकमेकांना धडकले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातग्रस्त ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

आज दुपारच्या सुमारास बंगळूर मुंबई महामार्गावर हा अपघात झाला. तीन ट्रॅक यामध्ये एकमेकांना धडकले. या अपघातानंतर तीनही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.. यानंतर काही वेळ या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. अपघातस्थळी सिंहगड पोलीस स्टेशनचे कर्मचारी, वाहतूक विभागाचे कर्मचारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी दाखल झाले आहे.

मागील काही दिवसांपासून नवले पूल परिसरात सातत्याने अपघात होत आहेत. या अपघातात आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक जण जखमी झाले आहेत. या परिसरात सातत्याने अपघात होत असल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. या परिसरात अपघात होत असताना लोकप्रतिनिधी आणि महामार्ग प्रशासनात फक्त बैठका सुरू आहेत. येथील महामार्ग बाबत अद्याप कोणताही ठोस उपाय मात्र झाला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.