Pune News : स्वारगेट ते अजिंक्यतारा सोसायटी मार्गे तुकाईनगर बस सेवा सुरू

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या वतीने क्रमांक 118 स्वारगेट ते वडगाव (वेणूताई कॉलेज) या मार्गाचे विस्तारीकरण करून स्वारगेट ते अजिंक्यतारा सोसायटी मार्गे तुकाई नगर अशी बस सेवा आजपासून (दि. 19) सुरू करण्यात आली. या बस सेवेचे उद्घाटन आमदार भिमराव तापकीर व नगरसेवक हरिदास चरवड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सचिन मोरे, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे, स्वारगेट डेपो मॅनेजर राजेश कुदळे, असिस्टंट डेपो मॅनेजर विकास मते, स्वारगेट डेपोचे कार्यालय अधीक्षक सुनिल कांबळे यांच्यासह परिसरातील सोसायट्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना आमदार भिमराव तापकीर म्हणाले, ‘चरवड वस्ती परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना ही बस सेवा सुरू झाल्यामुळे किफायतशीर दरात हक्काची प्रवासी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. या बस सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळून पीएमपीएमएल प्रशासनाला या मार्गावर आणखी बसेस वाढवाव्या लागतील.’

नगरसेवक हरिदास चरवड म्हणाले, ‘या परिसरातील नागरिकांना पुणे शहरात जाण्यासाठी बसची आवश्यकता होती. पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी ही बससेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.’

मार्ग क्रमांक 118 स्वारगेट ते अजिंक्यतारा सोसायटी मार्गे तुकाईनगर या बससेवेचा मार्ग स्वारगेट, पर्वती पायथा, विठ्ठलवाडी जकात नाका, विठ्ठलवाडी, आनंद विहार कॉलनी, साईनगर, महादेवनगर, तुकाई नगर, भन्साळी कॅम्पस, सिंहगड कॉलेज पायथा/ वडगाव पोलीस चौकी, सिंहगड कॉलेज गेट, औदुंबर चौक (दत्त मंदिर), ज्ञानोबा चरवड नगर, अजिंक्यतारा सोसायटी असा असणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.