Pune News :आमदार अनिल भोसले यांच्या दोन अलिशान कार जप्त

एमपीसी न्यूज – शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्या मालकीच्या दोन अलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत. दैनिक ‘लोकसत्ता’ने ही बातमी दिली आहे.

आमदार अनिल भोसले यांच्यासह 16 जणांविरोधात शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील 135 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार भोसले हे अटकेत असून या प्रकरणाच्या तपासला आता गती मिळाल्याचे दिसत आहे. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत भोसले यांच्या दोन कार तीन दिवसांपूर्वी जप्त करण्यात आल्या होत्या.

आता भोसले यांची अन्य मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यानुसार लवकरच कारवाई केली जाणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.