Pune News : गावठी पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना अटक

0

एमपीसी न्यूज – गावठी पिस्टल जवळ बाळगणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. पुणे -सासवड रोडवरील श्रेयस टायर्सच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानातून त्यांना आज (मंगळवारी) सापळा रचून पोलिसांनी जेरबंद केले.

निशांत भगवान भगत (वय 23, रा.पापडेवस्ती, फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे ) व आदित्य दत्तात्रय धुमाळ ( वय 19, रा.भेकराईनगर, फुरसुंगी, ता.हवेली, जि.पुणे ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे -सासवड रोडवरील श्रेयस टायर्सच्या पाठीमागे, एच.पी. पेट्रोलपंप समोरील मोकळ्या मैदानात तिघे जण संशयास्पदरित्या बसले असून त्यांच्याकडे पिस्टल व हत्यार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार हडपसर पोलिसांनी तेथे सापळा रचून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना पाहून एक आरोपी पळून गेला तर दोन जणांना ताब्यात घेण्यात यश आले.

आरोपी भगत व धुमाळ यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक गावठी पिस्टल व लोखंडी कोयता असे 20 हजार किंमतीचे शस्त्र आढळले. पोलिसांनी हे शस्त्र जप्त केले. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.