Pune News: येरवडा कारागृहातून दोन कोरोना पॉझिटिव्ह कैदी पळाले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना तात्पुरत्या कारागृहाच्या इमारत क्रमांक 104 मधील पहिल्या मजल्यावरील रुम नंबर 1 मध्ये ठेवण्यात आले होते. संधीचा फायदा घेत त्यांनी येथून पळ काढला.

एमपीसी न्यूज- येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहातून कैदी पळून जाण्याचे सत्र सुरुच आहे. या कारागृहातून पुन्हा एकदा दोन कैद्यांनी धूम ठोकली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही कैदी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाची झोप उडाली आहे. दोन्ही कैद्यांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे.

अनिल विठ्ठल वेताळ (वय 21, रा- गणेश नगर, भीमा कोरेगाव, ता-शिरूर, जि- पुणे) आणि विशाल रामधन खरात (घर नं 5, फातिमा मशिदीसमोर श्री समर्थ हौसिंग सोसायटी, निगडी, पुणे) असे पळून गेलेल्या कैद्यांचे नाव आहे.

वेताळ आणि खरात हे गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत. ते सध्या न्यायालयीन कोठडीत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना तात्पुरत्या कारागृहाच्या इमारत क्रमांक 104 मधील पहिल्या मजल्यावरील रुम नंबर 1 मध्ये ठेवण्यात आले होते. संधीचा फायदा घेत त्यांनी येथून पळ काढला.

दोन्ही कैदी हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. यापूर्वीही तात्पुरत्या कारागृहातून कैदी पळून गेले होते. यातील काहींना नंतर पुन्हा अटक करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.