Pune Crime News : अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना अटक, 22 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त

एमपीसी न्यूज – अंमली पदार्थ विक्री करणा-या दोन इसमांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाख 32 हजार किंमतीचे 22 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एकने ही कारवाई केली.

प्रसन्न बाळासाहेब शिंदे (वय 22, रा. वडगाव बुद्रुक, पुणे) व सौरभ लहु उंबरे (वय 21, रा. साईनगर, हिंगणे खुर्द, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रसन्न शिंदे याच्या जवळ 90 हजार किंमतीचे 15 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ, दोन मोबाईल, मोफेड, 6 हजार 200 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल मिळाला. आरोपी प्रसन्न शिंदे याने हा अंमली पदार्थ त्याचा मित्र सौरभ उंबरे याच्याकडून विक्रीसाठी घेतला होता अशी माहिती त्याने दिली.

पोलिसांनी आरोपी सौरभ उंबरे याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सात ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. या दोन्ही आरोपींकडून 1 लाख 32 हजार किंमतीचे 22 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. अटक आरोपी उंबरे हा सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.