_MPC_DIR_MPU_III

Pune News : विना मास्क फिरणा-यावर कारवाई दरम्यान पोलिसांना मारहाणीच्या दोन घटना

पुण्यातील कोरेगाव पार्क व सहकार नगर या दोन ठिकाणी सोमवारी (दि.7) ह्या घटना घडल्या आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विना मास्क बाहेर फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, विना मास्क फिरणा-यांवर कारवाई करत दंड वसूल केला जात आहे. असे असले तरी काहीजण नियमाचे उल्लंघन करत विना मास्क बाहेर फिरत आहेत. असेच विना मास्क बाहेर फिरणा-यांवर कारवाई करताना पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

पुण्यातील कोरेगाव पार्क व सहकार नगर या दोन ठिकाणी सोमवारी (दि.7) ह्या घटना घडल्या आहेत.

पहिली घटना कोरेगाव पार्क सेंट मिरा बस थांब्याजवळ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी बंडगार्डन वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार जयवंत भालेराव यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी आरोपी इलियास हासीम आतिया ( वय. 55) हासिम इलियास आतिया (वय. 23,दोघेही रा. टिंगरे नगर, पुणे) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भालेराव हे विना मास्क बाहेर फिरणा-यांवर कारवाई करत होते. त्यावेळी कार मधून मास्क न लावता जाणा-या आरोपी आतिया यांना भालेराव सांगितले.

मात्र, आरोपींनी गाडी पळवत पळ काढण्याचा प्रयत्न केला. भालेराव यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबवले. गाडी थांबवली म्हणून आरोपींनी भालेराव यांना लाथा बुक्यानी मारहाण केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

दुसरी घटना सहकार नगर येथील पुष्प मंगल चौक येथे त्याच दिवशी दुपारी साडे अकराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी सहकार नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक छाया गालिदवाड यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी आरोपी ऋषिकेश हनुमंत राऊत ( वय. 35, रा. धनकवडी ) व शौनक अनिल पानसे ( वय. 39, सहकार नगर) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक छाया गालिदवाड ह्या इतर दोन पोलीस शिपाई यांच्यासह विना मास्क बाहेर फिरणा-यांवर कारवाई करत होत्या.

त्यावेळी दुचाकी वरून मास्क न घालता फिरणा-या आरोपी राऊत व पानसे यांना थांबवून कारवाई केली जात होती.

त्यावेळी आरोपींनी कारवाई करणा-या पोलीस शिपायांना धक्का बुक्की केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.