Pune News: पुण्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यात मुंढवा आणि जांभूळवाडी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला.

मुंढव्यात झालेल्या अपघातात विनोद गेंदलाल सूर्यवंशी (वय 45, रा. संभाजी चौक) यांचा मृत्यू झाला आहे. विनोद हे रात्री आठच्या सुमारास केशवनगर-मांजरी रस्त्यावरून निघाले होते. त्यावेळी भरधाव ट्रकने सूर्यवंशी यांच्या दुचाकी धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने सूर्यवंशी यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रकचालक राजेंद्र केंद्रे (वय 43, रा. वाडेबोल्हाई, पुणे) याला अटक केली आहे.

दुसरा अपघात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर जांभूळवाडी दरी पूलावर बंद पडलेल्या अवजड ट्रकवर टेम्पो आदळून टेम्पोतील एकाचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली आहे.

या अपघातात  सायास शंकर चाटे (वय ३८, रा. चिंबळी, बर्गे वस्ती, ता. खेड, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.  टेम्पो चालक प्रदीप बाळासाहेब देवडकर (वय २५, रा. इंद्रायणी पार्क, ता. हवेली, जि. पुणे) हे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी पोलीस हवालदार अजित कोकरे यांनी भारती विद्याापीठ पोलीस ठण्यात फिर्याद दिली आहे. रात्री पावणेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार मोहन देशमुख तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.