Pune crime News : ‘एक लाखावर दरदिवशी दोन हजार रुपये’; तरुणाची 3 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑनलाइन जाहिरात पाहून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली एका तरुणाची 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक लाखावर दरदिवशी दोन हजार रुपये व्याज मिळवा, अशी जाहिरात दिली होती.

सुयोग चुडीवाल (वय 34, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुयोग एका खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक लाखावर दरदिवशी दोन हजार रुपये व्याज मिळवा, अशी जाहिरात वाचली होती. त्यानंतर त्यांनी पत्नीच्या नावे डी मॅट अकाउंट उघडून त्यामध्ये सहा लाख रुपये जमा केले.

त्यानंतर संबंधित कंपनीने सुयोग यांना चार लाख माघारी दिले. मात्र, उर्वरित 2 लाख रुपये आणि 1 लाखांचा परतावा अशी मिळून 3 लाखांची फसवणूक केली.

बिबवेवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.