Pune News : येत्या 15 दिवसात आणखी दोन ते तीन मंत्र्यांचे राजीनामे होणार असा सामन्यांचा अंदाज आहे – चंद्रकांत पाटील

0

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडी सरकारला जनता कंटाळली आहे. भ्रष्टाचार, हप्ते वसुली अशी प्रकरणे बाहेर येत आहेत. तरीही राज्य सरकार केंद्रावर बोट दाखवत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आणखी काय लागेल, हे तज्ज्ञांनी सांगावं. येत्या 15 दिवसात आणखी दोन ते तीन मंत्र्यांचे राजीनामे होतील, असा सामान्य जनतेचा अंदाज आहे, अशी सडकून टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.

चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून लोक अचंबित आहेत. सचिन वाझे हे महाविकास आघाडी सरकारला किती प्रिय आहेत, हे विधानसभा अधिवेशनाच्या वेळी दिसले. वाझे प्रकरणावरून सरकारने नऊ वेळा विधानसभा स्थगित केली. वाझे यांचा चार्ज काढून घेण्याची घोषणा अनिल परब यांनी केली. ही घोषणा गृहमंत्र्यांनी करायला हवी होती.

_MPC_DIR_MPU_II

आमदार पाटील पुढे म्हणाले, येत्या 15 दिवसात आणखी दोन ते तीन मंत्र्यांचे राजीनामे होणार हा सामान्यांचा अंदाज आहे. वाट पाहू आणखी कोणी कोर्टात जाईल. अनिल परब यांचा त्रागा आहे. चौकशीला सामोरे जाणार असाल तर शपथा कसल्या घेताय? निष्पक्षपणे चौकशी व्हावी म्हणून राजीनामा दिला आणि चौकशी होऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टात गेले. राठोड झाले, देशमुख झाले आणि परबांचे नाव आले आहे. ही संघटीत गुन्हेगारी आहे. या संघटीत गुन्ह्याचे पुरावे कागदपत्रात आले तर या सर्वांवर मोक्का लावावा. जो सामान्य नागरिकांना न्याय आहे, तोच न्याय यांनाही लावायला हवा.

मी राष्ट्रपती राजवटीची मागणी करत नाही. पण महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट लागू करु नये यासाठी काय राहिलंय, हे तज्ज्ञांनी सांगावं. कोरोनात भ्रष्टाचार करणार, हप्ते वसुली करणार आणि केंद्राकडे बोट दाखवणार. केंद्राने काय काय दिलं हे उघड असल्याचेही पाटील म्हणाले.

दिलीप वळसे पाटील यांनी गृहखात्याचा चार्ज घेताना कोणकोणते अधिकारी आरएसएसशी संबंधित आहेत, त्याचा शोध घेऊ असे सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दहशतवादी संघटना आहे का? ही गुन्हेगार संघटना आहे का ? कोरोना संकट, भूकंप अशा विविध संकटात आरएसएस किती कार्य करतो हे दिलीप वळसे पाटील यांनी सांगायची गरज नाही. तुमच्या राजकारणात आरएसएसला ओढू नका असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment