Pune News : दिवे घाटातील दरीत दुचाकी कोसळली, तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दिवे घाट उतरत असताना भरधाव वेगातील दुचाकी दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुचाकीवर असणारी तरूणी गंभीर जखमी झाली आहे. 

शिवाजी प्रकाश साळुंखे (वय 27, समता सोसायटी, रक्षक नगर, चंदननगर पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 15 मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शिवाजी साळुंखे हा रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दिवे घाट उतरत होता. या वेळी वडकी हवेली परिसरात त्याचे दुचाकीवर नियंत्रण सुटले आणि दुचाकी दरीत कोसळली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने शिवाजी साळुंखे यांचा मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेल्या त्याची मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.