Pune crime News : दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, आठ दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

अजय शिवकुमार पासवान (वय 21, रा. धायरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांना वाहन चोरट्यांना पकडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.  भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत गस्त घालत होते.

एमपीसी न्यूज – अंतरंग दसरा विशेषांक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी पोलीस कर्मचारी शंकर कुंभार व जगदीश खेडकर यांना एकजण कोंढवा रोडने दुचाकीवर संशयित रित्या जात असताना दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागला.

त्याची अधिक सखोल चौकशी केली असता त्याने शहरात विविध भागातून दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.