Pune News : अर्भकांना सोडून दोन महिलांचे ससूनमधून पलायन

एमपीसीन्यूज : अर्भकांना जन्म दिल्यानंतर रूग्णालयात उपचार सुरू असताना दोन महिलांनी ससूनमधून पलायन केले. या घटना ससूनमधील वॉर्ड क्रमांक 23 आणि 24 मध्ये घडल्या आहेत.

याप्रकरणी नंदबोधी पगारे (वय 38) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दोन महिलांनी अर्भकांना जन्म दिल्यानंतर त्यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सुरक्षारक्षकांची नजर चुकवून दोन्ही महिलांनी अर्भकांना ससूनमध्येच ठेउन पळ काढला आहे.

याप्रकरणी बंडगार्डन पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.