Pune News : विद्यापीठाच्या ‘मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन स्टडीज’ विभागाची पुन्हा बाजी

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन स्टडीज’ विभागाने ‘मास कम्युनिकेशन’ चे शिक्षण देणाऱ्या शासकीय शिक्षण संस्थांमध्ये देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. ‘आऊटलुक’ या नामांकित मासिकाने याबाबतचे सर्वेक्षण करत हे ‘रँकिंग’ जाहीर केले आहे. काहीच दिवसांपूर्वी ‘इंडिया टुडे’ या मासिकाने केलेल्या सर्वेक्षणात विभागाने 2019 व 2020 असे सलग दोन वर्ष चौथे स्थान मिळवले होते. अ‍ॅण्ड

दरवर्षी देशपातळीवरील काही नामांकित मासिकांकडून देशातील शैक्षणिक संस्थांचे सर्वेक्षण करत रँकिंग जाहीर केले जाते. ‘आऊटलुक आय केअर 2021’ सर्वेक्षणांतर्गत या मासिकाने या वर्षाची सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये ‘मास कम्युनिकेशन’ चे शिक्षण देणाऱ्या देशातील पहिल्या पाच संस्थांची क्रमवारी जाहीर केली असून त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला देशपातळीवर तिसरी सर्वोत्तम संस्था म्हणून घोषित केले आहे.

मला या गोष्टीचा आनंद आहे की आमचा विभाग हा केंद्रीय पातळीवरील तसेच सार्वजनिक विद्यापीठांच्या सर्व प्रस्थापित आणि सर्वात जुन्या ‘मास कम्युनिकेशन’ विभागांशी स्पर्धा करत आहे.
– डॉ. माधवी रेड्डी, विभागप्रमुख, मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन स्टडीज विभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विद्यापीठाच्या ‘मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज’ विभागाला दुसऱ्यांदा हे रँकिंग मिळाले याचा मनस्वी आनंद झाला असून हा दर्जा टिकवत अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न पुढील काळातही केला जाईल.
– प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.