Pune News : चार प्रभाग समितीच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या ४ प्रभाग समिती अध्यक्षांची सोमवारी ( दि. 5 ऑक्टोबर) बिनविरोध निवड झाली आहे. हे चारही भाजपचे उमेदवार  आहेत. तर, ढोले पाटील प्रभाग समिती अध्यक्ष चिठ्ठीवर ठरणार आहे. येत्या शुक्रवारी (दि. 9 ऑक्टोबर) पुणे महापालिकेच्या 15 प्रभाग समिती अध्यक्षांची निवड होणार आहे.

पीठासिन अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रावसाहेब भागडे काम पाहणार आहेत. दरम्यान, आगामी पुणे महापालिका निवडणुकीचा विचार करता, प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठीही राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांच्या गटाला स्थान देण्यात आले आहे.

औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी अर्चना मुसळे यांची, शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी सोनाली लांडगे यांची, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी अश्विनी पोकळे यांची, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी राजश्री शिळीमकर यांची बिनवीरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी झाली आहे.

प्रभारी नगरसचीव शिवाजी दौंडकर यांच्याकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल करतेवेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपहमापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभाग्रह नेते धीरज घाटे, स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर, तर महािवकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करतेवेळी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागूल, शिवसेनेचे गटनेते प्रथवीराज सुतार उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.