Pune News : … तो पर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू होणार नाहीत- उदय सामंत

एमपीसीन्यूज : सध्या राज्यात covid-19 मुळे निर्माण झालेली स्थिती सामान्य झालेली नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलावणे उचित ठरणार नाही. त्यामुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती जोपर्यंत निवळत नाही, तो पर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू होणार नाहीत. मात्र, ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच राहणार असल्याचेही उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरासह राज्यातील शाळा महाविद्यालय बंद आहेत ती अद्यापही उघडली नाहीत. परंतु, आता   व्यावसायिक दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे आता शाळा महाविद्यालय सुरू होणार की काय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मात्र इतक्यात महाविद्यालय सुरू होणार नसल्याचे सांगितले.

मंत्री सामंत पुढे म्हणाले, सध्या राज्यात covid-19 मुळे निर्माण झालेली स्थिती सामान्य झालेली नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलावणे उचित ठरणार नाही. त्यामुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती जोपर्यंत निवळत नाही, तो पर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू होणार नाहीत.

मात्र, ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सामंत म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहे. ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आठ ऑक्टोबरपासून सराव परीक्षा देता येईल.

राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्यामुळे संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची परीक्षा घेण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. याशिवाय परीक्षेसाठी जिल्हा प्रशासन व पोलिसांचे सहकार्य लागणार आहे.

परीक्षा केंद्रावर सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्याचे आदेश संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.