Pune News: विसर्जन हौदासाठी कचऱ्याच्या कंटेनरचा वापर; संबंधितांवर कारवाईचे महापालिका आयुक्तांचे आश्वासन

पुणे महापालिकेने शहरात 30 फिरते हौद गणेश विसर्जन करीता उपलब्ध करून दिले आहेत. त्यामध्ये काही ठिकाणी कचऱ्याच्या कंटेनरचा वापर करण्यात आला

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जन करण्यासाठी फिरत्या हौद रथात टाक्यांऐवजी कचऱ्याचे कंटेनर वापरल्याचा आरोप मनसेतर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितावर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यानुसार त्या एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे, अशी माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिली.

पुणे महापालिकेने शहरात 30 फिरते हौद गणेश विसर्जन करीता उपलब्ध करून दिले आहेत. त्यामध्ये काही ठिकाणी कचऱ्याच्या कंटेनरचा वापर करण्यात आला असल्याचा फोटोसंह आरोप मनसेतर्फे करण्यात आला होता.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. पुणे शहरात महापालिकेने उभारलेले तात्पुरते विसर्जन हौद सुरू करावेत, सामाजिक संस्था आणि गणेश मंडळांना विसर्जन हौद सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.