Pune News : मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरून दोघांनी मागितली व्यावसायिकाकडे खंडणी

एमपीसी न्यूज-पुण्यात भाजप चे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Pune News) यांचे नाव वापरून दोघांनी  खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी 3 कोटी रुपये द्या अशी मागणी व्यावसायिकाकडे करण्यात आली.

 

 या प्रकरणी राजेश व्यास यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून या संबंधी संदीप पाटील, शेखर ताकवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Pune Crime News : शाळकरी मुलीचा पाठलाग करून धमकावले, गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप पाटील आणि शेखर ताकवणे यांनी त्यांच्या मोबाईलवर “कॉल मी” नावाचे एक ॲप डाऊनलोड करून त्यात भाजप चे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचा मोबाईल क्रमांक सेव्ह केला. या ॲप द्वारे समोरच्या व्यक्तीला असे भासवले गेले की हा खरंच मोहोळ यांचाच नंबर आहे. तसेच आरोपींनी मोहोळ यांच्या मावसभावाचा देखील नंबरचा गैरवापर केला.
या दोघांनी या ॲपचा वापर करत पुण्यातील व्याव्यासिकला फोन करून भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमाला पैसे लागणार आहेत यासाठी 3 कोटी रुपये द्या, असे सांगून खंडणी मागितली. हा सगळा प्रकार खोटा असल्याचे लक्षात येताच त्या व्यावसायिकाने पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ मोबाईल (Pune News) क्रमांकावरून शोध घेत आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.