Pune News : नव्या नियमांमुळे पुण्यातील लसीकरण केंद्रावर शुकशुकाट

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या नव्या लसीकरण नियमावली मुळे ज्यांनी 84 दिवसांपूर्वी म्हणजेच 23 फेब्रुवारीपूर्वी कोव्हिशील्डचा पहिला डोस घेतला आहे, अशाच नागरिकांना दुसरा डोस मिळणार आहे. त्यामुळे बहुतांश लोकांना 40 दिवस, काहींना 50 दिवस तर काहींना 60 दिवस झाले होते. पण 84 दिवसाचा नियम असल्याने या नागरिकांना माघारी फिरावे लागले. त्यामुळे इतर वेळी 200-300 लोकांच्या गर्दीने भरलेल्या लसीकरण केंद्र आज सकाळी शुकशुकाट झाला होता.

बुधवारी सकाळी सहा-सात वाजल्यापासून लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली. तेथे नियुक्त असलेल्या सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी 45 वयाच्या पुढील नागरिकांचा पहिला डोस घेऊन 84 दिवस झाले असेल तरच त्यांना दुसरा डोस मिळेल, त्यापेक्षा कमी दिवस असतील तर त्यांनी येथून निघून जावे. तसेच पहिल्या डोससाठी ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, त्यांच्यासाठी केवळ 10 टक्के लस आहे, असे सांगण्यात आले.

त्यामुळे किमान दोन तास लाईनमध्ये थांबून राहिलेल्या नागरिकांना लस न घेताच घरी जावे लागले. लसीकरण केंद्रांवरील गर्दी ओसरल्याने 84 दिवस पूर्ण केलेले केवळ 5 ते 10 आणि पहिल्या डोससाठी नोंदणी केलेले 4-5नागरिक असे 10 ते 15 नागरिकांनी सकाळच्या वेळेत लस घेतली.

याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारलं असता ते म्हणाले “आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर पैकी अनेकांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे. त्यांचे लसीकरण आजचा टप्प्यात करण्यात येईल. याशिवाय जो इतर नागरिकांचा प्रश्न आहे त्या बाबत बैठक घेऊन आज आम्ही निर्णय घेणार आहोत. “

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.