Pune News : जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हेच ध्येय – चंद्रकांत पाटील

नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढकाराने पंडित दिनदयाळ शाळेत लसीकरण केंद्र सुरु - नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – लसीच्या उपलब्धतेनुसार लवकरच सर्वांचे लसीकरण करण्यावर भर दिला पाहिजे तसेच कोरोना वर मात करायची असेल तर Early detection & Early treatment महत्त्वाचे असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व भाजप प्रवक्ता संदीप खर्डेकर यांच्या प्रयत्नातून सुरु झालेल्या लसीकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.जितक्या लवकर आपण संसर्ग झालेली व्यक्ती identify करू आणि त्यांच्यावर उपचार सुरु करू तितक्या लवकर कोरोना वर मात करणे शक्य होईल असे ही ते म्हणाले.भाजप पुणे शहराच्या वतीने सुरु असलेल्या सेवा कार्याची माहिती ही चंद्रकांत दादानी यावेळी दिली.

पौड फाट्यावरील पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेत आजपासून लसीकरण केंद्र सुरु झाले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धनंजय काळे,नगरसेवक राजाभाऊ बराटे, दीपक पोटे, जयंत भावे, माधुरी सहस्त्रबुद्धे, स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, भाजपचे कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, शहर चिटणीस प्रशांत हरसूले, महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे, ओबीसी आघाडी अध्यक्ष रमेश चव्हाण, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे,डॉ. दीपक पखाले,डॉ. अरुणा तारडे, डॉ. शाहीन शेख,डी एस आय गणेश खिरीड,आरोग्य निरीक्षक राहुल शेळके इ उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

या केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना मदत करण्यासाठी प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, ऍड. प्राची बगाटे, महिला आघाडी च्या गौरी ताई करंजकर,संगीता आदवडे,जयश्री तलेसरा, मंगलताई शिंदे,रमाताई डांगे, उपेंद्र भोमें,कल्याणी खर्डेकर यांची टीम अविरत काम करणार आहे. या भागातील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे नातेवाईक परदेशी असून त्यांची सोय व्हावी यासाठी हे केंद्र सुरु करण्याबाबत मी आग्रही होते असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.

हे केंद्र सुरु करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, डॉ वैशाली जाधव, डॉ अंजली साबणे व वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्य्क आयुक्त संतोष वारुळे यांनी सहकार्य केले असे सांगतानाच प्रशासन लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे ही सौ खर्डेकर म्हणाल्या.

भाजप चा प्रत्येक कार्यकर्ता हा सेवा कार्यात व्यग्र असून आमचे लोकप्रतिनिधीच नव्हे तर सर्वजण जे जे शक्य आहे ते ते करत असल्याचे भाजप प्रवक्ता संदीप खर्डेकर म्हणाले. Early detection, Early treatment बरोबरच Early Isolation ही महत्वाचे असल्याचे स्पष्ट करतानाच संदीप खर्डेकर म्हणाले की बाधित रुग्ण बिनधास्तपणे फिरत असून त्या मुळे कोरोना चा संसर्ग वेगाने वाढत आहे, तसेच चाचणीचा अहवाल यायला दोन दिवस लागत असून त्या दरम्यान बाधित रुग्ण विलगीकरणात जातं नसल्याने ते संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरत आहेत असेही संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अधिकाधिक विलगीकरणं केंद्र सुरु करण्यावर भर दिला जावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कुलदीप सावळेकर, साधना लोकरे, गिरीश खत्री, नितीन आपटे, माणिक दीक्षित, शेखर जोशी, प्रतिक खर्डेकर, गौरव ओसवाल, विशाल रामदासी, रमेश पायगुडे, अमोल डांगे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.