Pune News : वैभव लोंढे याचे ‘सोड तुझा नखरा’ मराठी नवे गाणे

एमपीसी न्यूज – ‘खंडेराया’, ‘भिझलेली तू’ या सुपरहिट मराठी गाण्यांचा लेखक, दिग्दर्शक आणि गायक वैभव लोंढे यांचे नवे कोरे मराठी गाणे ‘नखरा’ नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

हटके अंदाजातील वैभवच्या या मराठी गाण्याची सध्या चांगलीच चर्चा होत असून, गाण्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

वैभव नेहमीच मराठी संगीतात वेगवेगळे प्रयोग करतो. ‘नखरा’ हे गाणे देखील वेगळे असून रसिकांना भुरळ घालत आहे. ‘पीबीए म्युझिक’ या प्लॅटफॉर्मवर 30 जुलै रोजी हे गाणे रिलीज झाले आहे. सध्या सोशल नेटवर्किंग साइटवर या गाण्याची चांगलीच चर्चा असून, हिंदी, पंजाबी गाण्यासारखा प्रयोग मराठीत होत आहे, ही चांगली बाब असल्याची अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘नखरा’ या गाण्याचे बोल स्वतः वैभवनेच लिहिले असून त्यांचेच संगीत आणि आवाज आहे. गाण्याची निर्मिती ॲन्जेला आणि तेजस भालेराव यांनी केली आहे. गाण्यात वैभव लोंढे आणि इलाक्क्षी गुप्ता थिरकताना दिसत असून, संपूर्ण गाण्याचे चित्रीकरण पुण्यातील नव्याने उभारलेल्या ‘पीबीए फिल्मसिटी’मध्ये करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.