Pune News: वंचित बहुजन आघाडीने केले डफली बजाओ आंदोलन

एसटी सेवा सुरू करा, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यातील एसटी तसेच शहरातील ‘पीएमपीएमएल’ सेवासह सर्व प्रकारची सार्वजनिक परिवहन सेवा सुरू करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार बुधवारी (दि.12) पुणे शहरातील एसटी महामंडळाचे विभागीय कार्यालय स्वारगेट येथील प्रवेशद्वाराजवळ डफली बजाओ आंदोलन करण्यात आले.

यावेळी पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसटी सेवा सुरू करा, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विभागीय महाराष्ट्र राज्य परिवहन नियंत्रक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व वंचित आघाडीचे देखरेख समिती प्रमुख व भारिपचे शहराध्यक्ष अतुल बहुले यांनी केले. या आंदोलनात वंचित बहूजन आघाडीचे नेते वसंत साळवे यांनी मार्गदर्शन केले.

या आंदोलनात वंचितचे देखरेख समिती सदस्य, नितीन शेलार, उत्तम वनशिव, सीमाताई भालसेन, यांच्यासह पुणे शहरातील महिला, युवक व कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.