Pune News : सराईत वाहन चोराला अटक ; दोन मोटरसायकली जप्त

एमपीसी न्यूज – सराईत वाहन चोराला अटक करण्यात पुणे शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला यश आले आहे. आज ( शुक्रवारी ) ससून हॉस्पिटल समोरून त्याला अटक करण्यात अली असून त्याच्या कडून दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

विजय ऊर्फ तेजस वाघमारे ( वय.21, रा. भिस्तबाग नाका, पंचवटीनगर, ता.जि. अहमदनगर, सध्या, पुणे ) असे अटक केलेल्या सराईत वाहन चोरट्याचे नाव आहे. त्याच्यावर हडपसर व लोणावळा पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय वाघमारे हा ससून हॉस्पिटल समोर सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांजवळ संशयितरित्या थांबला असल्याची माहिती युनिट दोनच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले.‌

प्राथमिक चौकशीत तो उडावाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यानंतर त्याला विश्वासात घेत तपास केला असता त्याने दोन मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन्ही मोटरसायकल जप्त केल्या. याप्रकरणी हडपसर व लोणावळा पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.